आमच्या विषयी

दूरसंचार सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा दूरसंचार नेटवर्कचा विस्तार करून व नवीन सेवा सुरु करण्यासाठी व भारताची राजकीय राजधानी दिल्ली व व्यावसायिक राजधानी मुंबई या दोन महानगरामध्ये दूरसंचार सेवा पूरवण्यासाठी व त्यापासून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी दि. १ एप्रिल १९८६ रोजी एमटीएनएलची स्थापना केली.   

आम्ही स्वांतत्र्य प्राप्ती नंतर वर्ष १९८२ मध्ये बॉम्बे टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करुन आमच्या व्यवसायास सुरुवात केली तेव्हापासून या क्षेत्रात आम्ही अग्रणी आहोत.   

पूर्वीची जी बॉम्बे तिला आता मुंबई या नावाने ओळखले जाते.  परिस्थितिनुरुप संचार सेवेच्या पध्दती मध्ये पण बदल होत गेला.  आम्ही सदैव नवीन सेवा सुरु केली आहे.  यामध्ये एकदम स्पष्ट आवाजाची लँडलाईन असेल, एडीएसएलच्या माध्यमातून उच्च गतिची ब्रॉडबँड सेवा आदीचा समावेश आहे.  जेव्हा इतर प्रचालक या सेवेसाठी ज्यादा किंमत घेऊन सेवा पुरवत होते तेव्हा आम्ही सर्वांना परवडेल अशी मोबाईल सेवेची सुरुवात केली.  आम्ही भारतामध्ये व मुंबईमध्ये ३जी सेवेची सुरुवात केली.  आम्ही व्हीओआयपी व आयपीटीव्ही सेवेची सुरुवात करण्यामध्ये अग्रभागी आहोत.    

आर्थिक राजधानी मध्ये अधिकतर सार्वजनिक उपक्रमानी एमटीएनएलला संपूर्ण सेवा पुरवणारा उपक्रम म्हणून अधिक पसंती दर्शवली आहे.  आम्ही मुंबई मध्ये ४५ लाख लोकांना दूरसंचार सेवा देऊन त्यांची गरज पूर्ण करतो.   

आम्ही, एमटीएनएल कंपनी कधीही यश मिळाल्वायावर कोठेही थांबत नाही.  निरंतर कमी दरांमध्लेये आपणास सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.  आपणास जर अशीच सुधारीत दूरसंचार सेवा हवी असेल तर आपण संपूर्ण  दूरसंचर सेवा देणा-या एमटीएनएलच्या सेवेवर पूर्णत: विश्वास ठेवा.