लिज्ड सर्कीट्स   

लिज्ड सर्किट्स ही लोकोपयोगी जोडणी (लिंक) आहे जी महत्वपूर्ण मुख्य केंद्र व साईट यामध्ये परस्पर संबंध स्थापन करते.  हे एक लोकप्रिय माध्यम जे आपल्या व्यवसायाचे उत्तम प्रकार संचलन करण्यासाठी आपली डाटा सेंटर, प्रचलीत साईट, कॉल सेंटरं ला एकमेकाशी जोडण्यासाठी, याचा वापर केला जातो.  लिज्ड सर्कीट हे एक स्पीच सर्कीट, एक डाटा सर्कीट किंवा टेलीग्राफ सर्कीट होऊ शकते.  एमटीएनएल कडून अशा प्रकारची वेगवेगळी सर्कीट सेवा उपलब्ध केली जाते. 

स्पीच सर्किट्स   

एका अर्जदारास एकाच शहरांमध्ये दोन स्थानांवरती किंवा दोन्ही शहरांमध्ये स्थानिक किंवा दिर्घ अंतराचे सर्कीट दिले जातात.  दोन्ही बाजूस टर्मिनेटींग उपकरण अर्थात डायल विना टेलिफोन सुविधेमध्ये दोन्ही बाजूस संकेतन व संभाषण करणे शक्य आहे.

डाटा सर्किट्स   

डाटा सर्कीट वेगवेगळया वेगाचे स्थानिक किंवा दिर्घ पल्ल्याचे क्षेत्रिय डाटा सर्कीट्स असतात.  उदा.  ६४ केबीपीएस, N X 64 केबीपीएस,  २ एमबीपीएस किंवा त्यापेक्षा अधिक वेगाचे.

पॉइंट टू पॉइंट डाटा सर्किट्स (एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणापर्यंत)  

ही सर्कीट एकाच शहरात किंवा दोन्ही शहरामध्ये दोन फिक्स टर्मिनलमध्ये अधिक प्रमाणात डाटाचे आदानप्रदान करुन डाटाचा उपयोग करण्यासाठी ग्राहकास फार उपयोगी सेवा आहे.  यामध्ये संगणकावर प्रतिकृति डाटा उपलब्ध केला जाऊ शकतो. 

पीएसटीएन वर डाटा सेवा  

ही सेवा कोणत्याही टेलिफोन कनेक्शन वरुन उपलब्ध केली जाऊ शकते.  यासाठी डाटा सर्कीट्स टर्मिनेशन उपकरण आवश्यक उदा.  साधारण टेलिफोन वर बोलण्यासाठी व कार्याममध्ये बदल करण्यासाठी पीएसटीएन मॉडेम.

प्रायव्हेट डाटा नेटवर्क 

या नेटवर्क मधून एका ठिकाणी किंवा एकापेक्षा अधिक स्थानिक ठिकाणी किंवा दिर्घ अंतराच्या लिज्ड सर्कीटना सेवा दिली जाते.  उदा.  एका ग्राहकांसाठी एका लिज्ड सर्कीटमधुन दूस-या सर्कीट वर डाटा आपोआप पाठवला जाऊ शकतो.  

क्लोज्ड यूजर ग्रुप   

जर ग्राहक क्लोज्ड यूजर ग्रुपचा आहे तर तो एकापेक्षा अधिक विधि एकक द्वारा लिज्ड सर्कीटचा उपयोग करु शकतो.  खासगी दूरसंचार नेटवर्कच्या परवानगीने खाली दिलेल्या संवर्गानुसार आपला क्लोजड यूजर ग्रुप बनवू शकतील. 

 • वस्तु/सामग्रीचे उत्पादक व होलसेल किरकोळ विक्री करणारे व्यापारी  / एजेंट्स.
 • अन्य सेवा प्रदानकर्ता (दूरसंचार सेवा प्रदानकर्ता नाही) व ठोक विक्री व्यापारी / एजेंट्स. 
 • एकाच पध्दतीची वस्तुचे उत्पादक .
 • साधारण सेवा प्रदान करणा-या व्यक्ती 
 • कंपनीचे मालक किंवा त्याचे मदतनीस. 
 • उपक्रमांशी जोडलेले अंतर्गत यूनिट 
 • एकाच कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये असणारी अन्य कंपनी. .
 • एअर लाईनची तिकीटे उपलब्ध करुन देणारे सदस्य/ट्रॅव्हल एजंट ज्यांचा उपयोग ते ग्रुप ऑफ मेंबर्स एअरलाईन्स नेटवर्क सहित करतात. 
 • एयरलाइन्सच्या अधिपत्यामध्ये संगणकीय आरक्षण प्रणाली (सीआरएस)ची सेवा उपलब्ध करणारी कंपनी. 
 • स्वयंचलीत टेलर मशीन्स (एटीएस), इलेक्ट्रानिक पॉईन्टस ऑफ सेल्स (ईपीओएस)/ क्रेडीट ऑयरायजेशन टर्मिनलच्या वापरलेले बँकेचे शेअर नेटवर्क 
 • जामीनदार किंवा त्यांचे एजंट/वितरकांबरोबर खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी मूलभूत नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था. 
 • म्यूचुअल फंड्स व त्यांचे एजंट म्हणून नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था 
 • ठेवीदार व त्यांचे एजंट/विक्रेता म्हणून नोंदणी केलेल्या वित्तीय संस्था. 
 • इतर वित्तीय संस्था.                                                                                                                           

 

आंतरराष्ट्रीय लीज्ड सर्किट्स   

विदेश संचार निगम लिमिटेडच्या मदतीने एमटीएनएल कडून लीज्ड सर्कीट सेवा उपलब्ध केली जाते.  

इंटरनेट लीज्ड लाइन्स   

ग्राहकांना  एमटीएनएल  ची   इंटरनेट  सुविधा  मिळण्याकरिता  ग्राहकांच्या निवासस्थानापासून थेट  समर्पित  जोडणी दिली  जाते. 

अधिक माहितीसाठी संपर्क :-

कॉरपोरेट हेल्प लाईन - ०२२ २४३६ ८६८६

 • श्रीमती लता माधवन   (उप महाप्रबंधक ईबीपी१/२): ०२२-२४३८ ५५७७ 
 • श्री मुथालगन (उप महाप्रबंधक ईबीजी१/२) - ०२२-२४२१ ०२२२/ ०२२-२४३० ९९८३